श्री बेल्हेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांत उत्तुंग यश

1 min read

बेल्हे दि.१६:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे. तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यालयाची गुणवंत विद्यार्थीनी निवेदिता मुळूक हीने राज्य गुणवत्ता यादीत बारावा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी:- मोमीन माहीन नूरजमील (२३२ गुण) बोरचटे आर्या रवींद्र (२३० गुण) आवारी वैभव पोपट (२१० गुण) वाडेकर ध्रुव प्रभाकर ( २१०गुण)महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थीः मुळूक निवेदिता नितीन (१५५ गुण) वाघ प्रतीक नितीन (१३४ गुण) फापाळे देवेंद्र दीपक (१२९ गुण) या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विकास गोसावी, नितीन मुळूक, विठ्ठल पांडे, कोमल कोल्हे त्याचबरोबर महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा विभाग प्रमुख जयराम मटाले, गोपाल फंगाळ, सदानंद भवारी, सुभाष बांगर, स्मिता बांगर, विजय कोल्हे, अजीम इनामदार, प्रशांत पादीर, बाळासाहेब गावडे या मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षक दत्तात्रय खोरे, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती,पालक शिक्षक संघ,माता पालक संघ व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!