बेल्ह्यातील आराध्या एचपी गॅस एजन्सी कडून मॉडर्न च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

1 min read

बेल्हे दि.१६:- एचपी गॅस च्या ५१ व्या फाउंडेशन दिनानिमित्त बेल्हे (ता. जुन्नर) येथील आराध्या एचपी गॅस एजन्सी कडून मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना LPG गॅस वापर व सुरक्षा या विषयी एजन्सीचे अध्यक्ष अशोक बोरचटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांना घरात गॅस शेगडी व टाकीची रचना कशी असावी, गॅस पाईप वरची एक्सपायरी डेट कशी चेक करावी, गॅस लिकेज नंतर कोणती काळजी घ्यावी, तसेच गॅस वितरकाकडून टाकी घेताना कोणकोणत्या बाबी तपासून घ्याव्यात याचे प्रात्यक्षिक देऊन यावर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच कोणतेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १९०६ या हेल्पलाइन नंबर वरती संपर्क करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी सिंग, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!