वळसे पाटील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी कुकडी नदीपात्र केले स्वच्छ
1 min read
निमगाव सावा दि.१५:-पर्यावरण संवर्धन व जलस्रोतांचे जतन या उद्देशाने श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत कुकडी नदीपात्र स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला.
या उपक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) व विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या उपक्रमात 75 विद्यार्थी 15 प्राध्यापक सहभागी झाले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नदीपात्रातील प्लास्टिक, कचरा, पालापाचोळा,
नदीत टाकलेले निर्माल्य तसेच निरुपयोगी झालेल्या विविध शीतपेयाच्या बाटल्या, जुनी कपडे, नदीपात्रात आणून टाकलेल्या विविध निरुपयोगी वस्तू आणि इतर घाण गोळा करून नदी परिसर स्वच्छ केला. तसेच नदीपात्राजवळ स्मशानभूमी, महादेव मंदिर परिसर या ठिकाणी असलेला कचराही गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
“स्वच्छ नदी- सुरक्षित भविष्य” या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृतीही निर्माण झाली. विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील शिक्षक, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचाही या उपक्रमात सहभाग होता.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जि. प. पुणे चे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार समाजात सकारात्मक बदल घडविणारा आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव होते.”
स्मशानभूमी परिसर आणि मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा. त्यांना विविध झाडे ग्रामपंचायत निमगाव सावा व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्याकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पांडुरंग पवार यांनी दिले.
संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार,सचिव परेश घोडे व सर्व पदाधिकारी आणि प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी हा उपक्रम इतर महाविद्यालयांसाठीही प्रेरणादायी असून सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सहभागी प्राध्यापक प्रा.अनिल पडवळ, प्रा. सुभाष घोडे, प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. आकाश धुमाळ प्रा.अजय ननवरे,
प्रा.योगेश भालेराव,प्रा.अमित साळवे,प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. नीलम गायकवाड, प्रा. माधुरी भोर, प्रा. उत्तरा काटे, प्रा. जाधव, प्रा.सोनाली ढोबळे, प्रा. कीर्ती टाव्हरे या सर्वांचे या उपक्रमाबाबत कौतुक केले.
