शरीरात फुटलेल्या अपेंडिक्सची धांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

1 min read

आळेफाटा दि.१४:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील धांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शरीरामध्ये फुटलेल्या अपेंडिक्सची दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया डॉ.राजेंद्र धांडे यांनी अवघ्या 25 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली.या बाबत अधिकची माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील एका पुरुषाच्या (वय ३२) पोटामध्ये अपेंडिक्स फुटले. त्यामुळे पेशंटला अत्यंत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे पेशंट व नातेवाईक अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होते. रुग्णालयात उपचारासाठी आले होते. डॉक्टर राजेंद्र धांडे यांनी त्यांची तपासणी केली. त्यांना धीर देत मार्गदर्शन केले. दुर्बिणीच्या सहाय्याने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यावरून डॉ .धांडे व टीमने गुरुवार दि.१० रोजी सायंकाळी ही शस्त्रक्रिया अवघ्या २५ ते ३० मिनिटांत यशस्वी रित्या पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.११ रोजी दुपारी २ वाजता पेशंटला डिस्चार्ज देण्यात आला. पेशंटला कोणतीही वेदना नसून पेशंट चालत घरी गेले. अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर धांडे यांचे आभार मानले. डॉ. राजेंद्र धांडे हे प्रचंड अनुभवी प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ असून काही वेळातच पेशंटचा त्रास कमी करून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करतात. त्यांनी आजपर्यंत हजारो शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यामध्ये अवघड प्रसूती, लॅप्रोस्कोपी, अत्याधुनिक दुर्बिणीतून पोटाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, अंडाशय व गर्भाशयाच्या गाठीच्या शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे कॅन्सर व छातीतील गाठीचे ऑपरेशन, व्यंधत्व चिकित्सा, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, थायरॉईडचे ऑपरेशन, अशांचा समावेश आहे. त्यामुळे अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया साठी राज्यभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!