श्री विघ्नहरचे तज्ञ संचालक विकास चव्हाण यांचा भिमाशंकर साखर कारखाण्याकडून गौरव

1 min read

पारगाव दि.१४:- पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील युवा ऊस अभ्यासक विकास हरिभाऊ चव्हाण यांची नुकतीच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याच्या तज्ञ संचालकपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीबाबत भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्या वतीने विशेष गौरव करून सन्मानित करण्यात आले.विकास चव्हाण हे कृषी पदवीधर असून त्यांनी ऊस शेतीमध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले. या उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना वसंतराव नाईक कृषीनिष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्काराव्यतिरिक्त ऊस भुषण पुरस्कारासह पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.ऊसाचा खोडवा व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, शुगरकेन नर्सरी, पाण्याचे व्यवस्थापन, जमीनीच्या सुपीकतेवरील प्रयोग आदिंसारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातुन त्यांनी ऊस शेतीत सुधारणा घडवून आणल्या. राज्यभरात शेतकरी मेळावे व प्रात्याक्षिकांच्या माध्यमातुन त्यांनी ऊस उत्पादकांपर्यंत हे ज्ञान पोहोचविले. त्यांच्या शेतातील एकरी १२६ टन ऊस उत्पादन व खोडवा उसाचे टकरी ११० टन ऊस उत्पादन हे त्यांचे उल्लेखनीय यश असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबदद्ल आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी कारखाण्याच्या वतीने कृत्रिम बुद्धीमत्ता ( Al ) आधारीत कृषी विषयक पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे