जुन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या शेतीचा पुणे जिल्हा बँक कर्ज थकीत असल्यामुळे घेणार ताबा
1 min read
जुन्नर दि.१४:- जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा बँकेकडून शेतीसाठी पीक कर्ज मध्य मुदत, दीर्घ मुदत कर्ज घेतलेले आहेत. शेतीमालाला शाश्वत बाजार भाव नसल्याने व अतिवृष्टी, शेतीवर अनेक संकटे मागील काही वर्षांपासून येत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडता आले नाही.त्यातच राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊ,सातबारा कोरा करू,निवडणुकीमध्ये वचनामा जाहिर केला होता.परंतु शासनाने कर्जमाफी न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसले आहे व जखमेवर मिठ चोळण्याचा काम राज्य शासन करत आहे.
जुन्नर तालुक्यामधील काही गावांमधील विकास सोसायटी यांनी जिल्हा बँकेमार्फत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीचा ताबा दि.१५/०७/२०२५ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय जुन्नर हे घेणार आहेत. याला जुन्नर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे.
यासंबंधी तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुन्नर या तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. या संबंधीचे निवेदन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दुर्गुडे व संचालक संजय काळे यांना दि.७/७/२०२५ रोजी पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय पुणे या ठिकाणी दिलेले आहे.
तसेच पुणे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, सहकार आयुक्त पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव पोलीस स्टेशन,पुणे जिल्हा सहकारी बँक जुन्नर शाखा नारायणगाव यांना या आंदोलनासंदर्भात निवेदन दिलेले आहे.शासनाने दिनांक १५/०७/२०२५ पूर्वी फळे उत्पादक शेतकऱ्यांच्या
शेतीचा ताबा स्थगिती व संपूर्ण कर्जमाफी बाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन केले जाणार आहे. या निवेदनाची दखल घेऊन शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना लेखी पत्र द्यावे व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असा इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगरसाहेब व प्रमोद खांडगे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका यांनी दिला आहे.