ब्रिटनमध्ये टेकऑफनंतर हवेतच विमान जळून खाक

1 min read

लंडन दि.१३:- अहमदाबादमधील एअर इंडियाचा विमान अपघात ताजा असतानाच ब्रिटनमध्ये विमान कोसळलं आहे. ब्रिटनच्या साउथेंड एअरपोर्टवरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच बीचक्राफ्ट बी200 हे छोटं प्रवासी विमान कोसळलं आहे.हे विमान ब्रिटनमधून हे विमान नेदरलँड्समधील लेलीस्टॅडला जात होतं, पण टेकऑफनंतर विमानाला आग लागली, ज्यामुळे विमान धावपट्टीजवळ कोसळलं.समोर आलेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर विमान अचानक आगीच्या गोळ्यात बदलले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विमानातून धूर आणि ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसत आहे. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले ते धावपट्टीजवळ कोसळून मोठा आवाज झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एसेक्स पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मृतांची आणि जखमींच्या संख्येबाबत माहिती समोर आलेली नाही.एसेक्स पोलिसांनी या घटनेबाबत एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, “साउथेंड विमानतळावर झालेल्या विमान अपघाताचे बचावकार्य सुरू आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात तांत्रिक बिघाड किंवा इंजिन फेल झाल्यामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे. या अपघातानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी सध्या धावपट्टी बंद केली असून सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. आता या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे