उड्डानानंतर काही क्षणात दोन्ही इंजिन पडली बंद; अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताच गुड उकलल

1 min read

मुंबई दि.१२:- अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारतीय विमान दुर्घटना तपास ब्युरोने आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्यानुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर पुढील काही सेकंदात विमानाचे दोन्ही इंजिन अचानक आपोआप बंद झाले होते. यामुळे विमान खाली कोसळल्याचं सांगितलं जात आहे. AAIB च्या 15 पानी रिपोर्टनुसार, विमान सकाळी साधारण 8.08 वाजता 180 नॉट्स अधिकांश इंडिकेटेड एअरस्पीडपर्यंत पोहोचले होते. याच्यानंतर लगेलचच इंजिन 1 आणि इंजिन 2 च्या इंजिन कट ऑफ स्विच (ज्यातून इंजिनला इंधर पोहोचले जाते) RUN हून CUTOFF पोझिशनपर्यंत पोहोचलं आणि एका सेकंदात इंजिनमध्ये इंधन पोहोचणं बंद झालं आणि दोन्ही इंजिन Na1 आणि N2 रोटेशन स्पीडने जलद गतीने खाली आलं. रिपोर्टमध्ये पायलटांमधील संभाषणाबाबतही मोठा खुलासा झाला आहे. यावेळी कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला पायलटला तू इंजिन का बंद केलं, असं विचारत होता. मी काहीच केलं नसल्याचं दुसऱ्या पायलटने उत्तर दिलं होतं. या संभाषणावरुन या दुर्घटनेच अधिक संशय व्यक्त केला जात आहे. कारण दोन्ही पायलटांनी इंजिन बंद केलं नसल्याचं सांगितलं होतं.त्यामुळे हा इंजिनमधील तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप तपासात कोणताही बिघाड कळू शकलेला नाही.रिपोर्टनुसार, दोन्ही इंजिनमध्ये रिलाइची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. इंजिन 1 रिकव्हर होत होता, मात्र दुसरं इंजिन पूर्णपणे स्पीड रिकव्हर करू शकला नाही. यादरम्यान ऑटोस्टार्ट मोड सुरू झाला. मात्र तरीही विमान स्थिर होऊ शकलं नाही. एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर असंही समोर आलंय की, टेकऑफच्या लगेचच विमानाची Ram Air Turbine म्हणजेच आपत्कालिन पंखा बाहेर आला होता. सर्वसाधारणपणे विमानाच्या वीज पुरवठ्यात अडथळा आल्यानंतर Ram Air Turbine किंवा पंखा बाहेर निघतो. याचा अर्थ इंजिन बंद झाल्यामुळे विमानाच्या मुख्य वीज पुरवठ्यात परिणाम झाला होता. Ram Air Turbine एक छोटं प्रोपेलरसारखं उपकरण आहे. दोन्ही इंजिन बंद झाल्यानंतर किंवा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर विमानात उंचावर स्थिर ठेवण्यासाठी मदत करतं.आरएटी आपत्कालिन शक्ती उत्पन्न करण्यासाठी हवेच्या गतीचा उपयोग करतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे