आणे सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ. दीपक आहेर यांची बिनविरोध निवड 

1 min read

आणे दि.१२:- डॉ. दीपक आहेर यांची श्रीरंगदास स्वामी विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणे (ता. जुन्नर) च्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमन पदी देऊबाई बेलकर यांची सर्वानुमते निवड झाली. अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली.

सहाय्यक निबंधक संतोष भुजबळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया संपल्यावर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. यावेळी सोसायटी चे सचिव निशांत दाते, सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!