लायन्स क्लब ऑफ नारायणगाव अध्यक्षपदी अभिषेक भुजबळ यांची निवड

1 min read

नारायणगाव दि.१२:- लायन्स क्लब ऑफ नारायणगाव अध्यक्षपदी ला. अभिषेक राजीव भुजबळ, सचीवपदी ला. योगेश संभाजी रायकर तर खजीनदारपदी ला. वैभव राजेंद्र सोनवणे याची निवड झाली.लायन्स क्लब ऑफ नारायणगाव पदग्रहण समारंभ यशोधन रिसोर्ट येथे संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरमन MJF ला.गिरीष मालपाणी VDG 2 ला राजेंद्र गोयल, ला. झोन चेअरपर्सन सुरेश कानडे मावळते अध्यक्ष राजेंद्र देसाई अनेक मान्यवर लायन्स मेंबर उपस्थित होते. या पदग्रहण प्रसंगी ला. गिरीष मालपाणी यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अभिषेक भुजबळ, सचीव ला. योगेश रायकर तर खजीनदार ला. वैभव सोनवणे व सर्व संचालक मंडळास यांनी पदग्रहण करुन पदाची जबाबदारी समजुन शपथ दिली. ला. राजेंद्र गोयल यांनी सर्व नवीन लायन्स मेंबरला शपथ दिली याप्रसंगी झोन चेअरपर्सन सुरेश कानडे यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना सहकार्य करु असे आव्हाहन दिले. तसेच यावर्षी मावळते अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी क्लबच्या सभासदांना ट्रॉफी व सर्टीफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवीन 32 लायन्स मेंबर यांनी शपथ घेतली.या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष ला. अभिषेक भुजबळ यांनी अध्यक्षीय भाषणात कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोफत उपचार मिळणार असे आश्वासन दिले. तसेच गरजुंना अल्पदरात झुणका भाकर देणार असून लवकरच याचा शुभारंभ होणार आहे. तसेच शैक्षणित क्षेत्रातही काम करणार आहे.या कार्यक्रमासाठी माजी झोन चेअरपर्सन ला. प्रिती बोंडे, जयवंत बोंडे, ला. विदया वकारे, ला. संतोष बोडके, क्लबचे आधारस्तंभ मनोज भळगट, कल्पेश गुगळे, अभय पाटे, गिरीष मुनोत, आनंद कोठारी, विशाल बो-हाडे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. किरण भांगरे, शरद खांडगे, वैभव मुथ्था, प्रशांत इचके, प्रकाश निमसे, सुधीर भागवत, कुलदीप नलावडे तसेच अनेक नवीन सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय वारुळे,मनोज भळगट यांनी केले. सेकटरी अनाऊसमेंट ला. योगेश रायकर यांनी केली. तसेच आभार ला. अभय पाटे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!