गुरुपौर्णिमे निमित्त विद्यानिकेतन च्या शिक्षकांचा विद्यार्थांकडून सन्मान

1 min read

साकोरी दि.१२:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी (ता.जुन्नर) येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षस्थानी असणाऱ्या संस्थेचे संस्थापक पी.एम.साळवे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वतीपूजन करून करण्यात आले. त्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गुरुरुपी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. इयत्ता ज्युनिअर के.जी. ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टीरूपात सांगितले. तसेच पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही दिली. यावेळी गुरुपरंपरा,गुरूचे महत्त्व,एकलव्य, गुरू द्रोणाचार्य यासारखे अनेक दाखले देत गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल विद्यालयातील शिक्षिका भगत मॅडम व कल्याणी शिंदे यांनी माहिती दिली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वीत शिकत असणाऱ्या आदिती चोरे व नम्रता कुंजीर या विद्यार्थिनींनी केले.कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव) आणि विद्यालयाच्या सांस्कृतिक (CCA) विभागाने केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!