कोथिंबीर जुडी ५० पैसे;कवडीमोल भावा मुळे बळीराजा हवालदिल
1 min read
नारायणगाव दि.१२:- कोथिंबीर व मेथीचे बाजारभाव पडले असून कवडीमोल दराने गुरुवारी (दि.१०) लिलाव झाले. कोथिंबीर व मेथीची जुडी अवघी ५० पैसे ते १० रुपयाला एक जुडी विक्री झाली. दरम्यान, आवक देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव एकदम गडगडले.
त्यामुळे व्यापाऱ्यांनी अनेक मेथी व कोथिंबिरीच्या जोड्या जागेवरच टाकून दिल्या. बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये गुरुवारी मेथीची आवक एक लाख २७ हजार ६०० जुड्या व कोथिंबिरीची आवक २ लाख ८१ हजार ३०० जुड्या असे दोन्ही मिळून ४ लाख ४० हजार ५०० जुड्यांची आवक झाली.
दरम्यान कोथिंबीर, मेथीचे बाजारभाव पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. कोथिंबीर व मेथी काढणे तसेच मार्केटमध्ये विक्रीला आणणे, याचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर आला आहे.
