आळेफाटा परिसरात चोऱ्या करणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद; ११ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 min read
आळेफाटा दि.१०:- आळेफाटा येथील लक्ष्मी इंटरप्रायजेस किराणा मालाच्या दुकानाच्या वॉचमनचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या पर जिल्हातील अट्टल टोळीस आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले आहे.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२० जुन रोजी रात्री
दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा (ता. जुन्नर) गावचे हद्दीत लक्ष्मी इंटरप्रायजेस दुकानास सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत असलेला जगदिश गणेश गतवा बम ४८ वर्षे रा. आळेफाटा यास एका पांढच्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील चार अज्ञात चोरटयांनी चोरी करणे सोपे जावे माणून गाडीमध्ये बसवून घेतून कातून मारहाण करून.
त्याचा मोबाईल व त्याच्या खिशातील १ हजार ५०० रूपये रोख रक्कम काढून घेवून त्याला (बोटा ता. संगमनेर जि.अहिल्यागनर) गावच्या हद्दीत सोडून देवून तसेच दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश करून दुकानातील २ लाख ५३ हजार २०० किंमतीचे सिगारेट व गायछाप चोरून नेले बाबतचा दि.२० जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांर्भाय लक्षात घेता, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी पोलीस स्टेशनकडील गुन्हे पथकाला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पवफ हे सदर गुन्हयातील आरोपीचा व गुन्हयातील वापरलेल्या वाहनाचा शोध घेत असताना,
नमुद गुन्हे शोध पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. सदरचा गुन्हा सलमान सादीख शेख रा. मोमीनपुरा, खाजानगर, बीड ता.जि.बिड याने व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडील स्विफ्ट डिझायर कार व इनोव्हा गाडीतून येवून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली,
त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथक हे बिड जिल्हयात जावून आरोपी सलमान सादीख शेख यांस त्याने गुन्हयात वापरलेली एम.एच.१३ डी.वाय.५९२० इनोव्हा गाडीसह सापळा रचून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल बौकशी केली असता त्याने त्याचे इतर ०७ साथीदारासह सदरचा गुन्हा केला.
असल्याची कबुली देवून गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल हा त्याचे राहते घरात लपवून ठेवला असल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तसेच गुन्हातील दुसरे वाहन एम.एच.०२ इ.एच ४७५८ मारूती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर हि जप्त करण्यात आली असून इतर आरोपीचा शोध सुरू असुन.
सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनांसह ११ लाख ९६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास
जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पो. हवा. विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित माळुंजे, पो. कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, सखाराम जुबड, प्रशांत तांगडकर, सचिन कोबल यांनी केली आहे.
