श्रीराम विद्यालयात EVM ॲप द्वारे निवडणूक

1 min read

मंचर दि.८:- पिंपळगाव खडकी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयात वर्गमंत्रीमंडळ निवड ही E.V.M. वोटिंग मोबाईल ॲप द्वारे घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घेतला. निवडणुकीपूर्वी उमेदवारांना चिन्ह व मतदारांना ओळखपत्र देण्यात आले.विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये आपापला प्रचार केला.आपली ओळख पटवणे ,बोटाला शाई लावणे,विद्यार्थ्यांनी वोटिंग ॲप वर आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढील बटन दाबणे व मतदान झाल्यानंतर मशीन मधून येणारा विशिष्ट आवाज हे अनुभव विद्यार्थ्यांसाठी नविन ठरले.मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी करून वर्गातील मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले.मतदान प्रक्रियेसाठी विद्यालयाचे प्राचार्य फापाळे डी.पी. यांनी प्रोत्साहन दिले. वर्गशिक्षिका अर्चना आचार्य व सुमती राजगुरू यांनी इयत्ता सहावी ची मतदान प्रक्रिया राबविली. तसेच केशव टेमकर यांनी इयत्ता नववीची मतदान प्रक्रिया राबवली. मत मोजणीसाठी इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!