चैतन्य विद्यालयात ‘एक पेड़ माँ के नाम ‘ चा उपक्रम
1 min read
ओतूर दि.८:- पुणे जिल्हा परिषद , पुणे प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित १० कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर मध्ये तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, घराच्या मोकळ्या परिसरात अनेक वृक्षांचे वृक्षारोपण केल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
आपल्या जीवनात जसे आईचे अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच झाडे सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत. जीवनातील झाडांचे महत्त्व, उपयोग विद्यार्थ्यांना समजावे , आईप्रमाणे वृक्षसुद्धा आपले जीवन आनंदी , उत्साही करतात. पर्यावरण संवर्धन व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाप्रती जागृती निर्माण व्हावी.
म्हणून प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे हा हेतू समोर ठेवून पुणे जिल्हा परिषद, पुणे प्राथमिक शिक्षण विभाग यांनी १० कोटी वृक्ष लागवड ही मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचे ‘एक पेड माँ के नाम ‘ हे घोषवाक्ये आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक झाड आईच्या नावाने लावण्याची व त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
विद्यालयाच्या परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने चाफा, तगर, गुलाब, रातराणी,जास्वंद, क्रोटन, बकुळा, आदी प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर जांभूळ, कडूनिंब, कवठ, पेरू, चिकू, आंबा, पिंपळ, वड या झाडांचे वृक्षारोपण केले.
यावेळी ग्राम विकास मंडळ ओतूर चे अध्यक्ष अनिल तांबे , प्रभाकर तांबे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुंबरे, सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, अमोल डुंबरे, राजश्री भालेकर, संजय हिरे, अनिल उकिरडे, अजित डांगे, संतोष कांबळे,
लक्ष्मण दुडे, ईश्वर ढमाले, योगेश फापाळे यांचे हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन संतोष कांबळे व लक्ष्मण दुडे यांनी केले.
