विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटचा शुभम मोरे सीईटी प्रथम
1 min read
बोटा दि.६:- विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट बोटा (ता. संगमनेर) संचलित जूनियर कॉलेजचा महाराष्ट्र सीईटीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रथम मोरे शुभम संपत यांनी 99.75 परसेंटाइल मिळविले आहे व NEET परीक्षेत 480 मार्क मिळाले आहेत. तसेच एच एस सी बोर्ड परीक्षेत त्याला 80 टक्के मार्क मिळाले होते.
तसेच द्वितीय क्रमांक गाडेकर धनश्री राजेंद्र हिने सीईटी त 99.11 परसेंटाइल व नीट परीक्षेत 420 मार्क मिळवले आहेत. तसेच इयत्ता बारावीची विद्यार्थिनी धनश्री सतीश माळी हिची IIT च्या लेव्हलचे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज गतिशक्ती विश्वविद्यालय वडोदरा (गुजरात) येथे निवड झाली आहे.
विशेष बाब म्हणजे धनश्रीला 77% मार्क JEE परीक्षेमध्ये मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांनी अकरावी बारावी आपल्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन JEE/CET/NEET चा अभ्यास केला होता. यांना कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. सर्व स्तरातून या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आग्रही असलेल्या विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट, बोटा येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेची आधुनिक शिक्षणसुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, बस व होस्टेल व्यवस्था तसेच संस्कारमूल्यांवर आधारित वातावरण ही खास वैशिष्ट्ये आहेत.
मुलींसाठी शिक्षण मोफत असून, विद्यार्थींना समान संधी देण्यात येत आहे.विद्यार्थी व पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, मर्यादित जागांकरिता लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम:डी. फार्मसी, बी. फार्मसी,एम.फार्मसी (5464), डिप्लोमा व डिग्री इंजिनियरिंग (5408),
एमबीए व एमसीए (5665), lTI (NCVT), ज्यू. कॉलेज (सायन्स व कॉमर्स), (CBSE) स्कूल संस्थेतील स्मार्ट क्लासरूम्स, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत लॅब्स, सुरक्षित परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शैक्षणिक दृष्टी हे यशस्वीतेचे गमक ठरत आहे.
संस्थेचा पत्ता: विद्यानगरी, आळेफाटा, पुणे-नाशिक महामार्ग,बोटा ता. संगमनेर, जि. अहमदनगर – 422602 वेबसाईट: www.vidyaniketanglobal.com 📞 संपर्क: 9172453737 9172453938
9172453939
