श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलचा रानमळा गावात पालखी सोहळा उत्साहात साजरा

1 min read

रानमळा दि.५:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल व जि. प. प्राथमिक शाळा, रानमळा यांच्या संयुक्त विद्यमाने रानमळा गावामध्ये विद्यार्थ्यांना वारकरी सांप्रदाय व भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा या उद्देशाने शनिवार दि.5 रोजी श्री विठ्ठल-रखुमाई तसेच ग्रंथ व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये या दिंडीमध्ये सहभागी होत या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. सर्व पालक – ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी या सर्वांनी देखील या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. टाळ – मृदंग व भजन – कीर्तनाच्या तालावर सर्व लहान थोरांनी नृत्य करत या सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांतर्फे खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!