रसायनमुक्त शेतीसाठी त्यांचा पुढाकार;प्रदीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

मंचर, दि. २ (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे पहिले कृषीप्रधान मुख्यमंत्री (स्व) वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त देशी वाणलागवड, संवर्धन व रसायनमुक्त शेती याबाबत जीन बैंक नागपूर व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. याबाबत गावोगावी चळवळ उभी राहिली पाहिजे. शेतकर्यांनी किमान पाच ते दहा गुंठे देशी वाण लागवड करून उत्पादित भाजीपाला व तरकारीचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी करावा. कुटुंब विविध आजारापासून मुक्त होण्यास मदत होईल, असे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.मंचर येथील शरद बँकेच्या दत्तात्रय वळसे पाटील सभागृहात मंगळवारी (दि. १) आंबेगाव तालुका पंचायत समिती, कृषी विभाग वन, बाजार समिती व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने देशी वाण उत्पादन करणार्या आठ शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अॅड. वळसे पाटील बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, बाजार समितीचे सभापती निलेश (स्वामी) थोरात, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, वन परिक्षेत्राधिकारी विकास भोसले, अशोक बाजारे, ऋषिकेश गावडे, दिलीप लोखंडे, शरद बँकेचे पंढरीनाथ भोर, रंजना शेटे, रागिणी बोराडे, कृषी सहाय्यक, ग्रामविकास अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!