डॉ. वसुधा विश्वासराव पाटील यांना ‘भारत स्वाभिमान पुरस्कार २०२५’

1 min read

अहिल्यानगर दि.३:-श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नेप्ती, अहिल्यानगर येथील सहाय्यक प्राध्यापिका व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख डॉ. वसुधा विश्वासराव पाटील यांना ‘भारत स्वाभिमान पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार व्हेयिल फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात आला असून, भारत सरकारकडून मान्यता प्राप्त आहे. डॉ. पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान २३ जून २०२५ रोजी प्रदान करण्यात आला.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हाय. आर. खर्डे, सहकारी प्राध्यापकवर्ग व विभागाचे प्रमुख डॉ. एम. के भोसले, प्रा. पी . जी. निकम, प्रा. एस. एम. वाळके, प्रा. ए. बी. काळे, प्रा. एस. पी. विधाते आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!