शगुन ज्वेलर्स अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीला
1 min read
आळेफाटा दि.१:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथे शगुन ज्वेलर्स यांच्या भव्य शोरूम चे भव्य उद्घाटन ७ एप्रिल रोजी झालं. या दिवशी त्यांनी ग्राहकांना लकी ड्रॉ चे आयोजन करणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानुसार १०१ भाग्यवान ग्राहकांना जिंकलेल्या विविध वस्तूच वितरण सोमवार दि. 30 रोजी केले. यामध्ये दोन भाग्यवान विजेते अनिकेत वायकर व पल्लवी टट्टू या दोन्ही ग्राहकांना स्कुटी मिळाली. केतन भोर केतन, गुंजाळ मनीषा, कुऱ्हाडे पुष्पा, शेख मोहम्मद, जाधव रामदास, देवकर धनंजय, गायकर वेदांत यांना एलईडी टीव्ही संच मिळाला.

जाधव गीतांजली, संगीता परंडवाल, कणसे सुनंदा यांना बजाज कंपनीचा मिक्सर मिळाला. तसेच कर्डक संतोष, जाधव रवी, भोर कैलास यांना बजाज कंपनीचा फॅन मिळाला. यांसह अशा शेकडो वस्तूंचे वाटप करण्यात आलं.

यावेळी शगुन ज्वेलर्सचे बाबू जाधव, ओम जाधव, भगवान जाधव, मॅनेजर विजय काळे यांच्या शुभहस्ते हे वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद उसळून वाहत होता. अशा स्कीम यापुढेही चालू राहणार असल्याचे यावेळी ओम जाधव यांनी सांगितलं.

