जुन्नर पंचायत समितीत कृषी दिन साजरा
1 min read
जुन्नर दि.१:- स्वर्गीय वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर पंचायत समिती येथे कृषी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी माजी सभापती विशाल तांबे, जुन्नर बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके, राहुल घाडगे शास्त्रज्ञ ,कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, प्रतीक चनावार गटविकास अधिकारी ,
पंचायत समिती जुन्नर, गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी जुन्नर , निलेश बुधवंत, कृषी अधिकारी, पंचायत समिती जुन्नर, रावते दत्तात्रेय कृषी अधिकारी पंचायत समिती जुन्नर, लक्ष्मण झांजे, विनायक मोढवे, रमेश मैड विस्तार अधिकारी कृषी, जितेंद्र बिडवई प्रगतशील शेतकरी, राजाराम चौधरी , अजय बेल्हेकर , विकास चव्हाण, बाबाजी बांगर, नीलम बेल्हेकर, सिताराम पाटेकर,
पोटे इत्यादी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने व सहाय्यक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. वरील पाहुण्यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार व फुले वाहून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश बुधवंत यांनी केले.स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा व त्यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगारी तसेच महाराष्ट्राला अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण करण्यामध्ये स्वर्गीय नाईक साहेबांचा असलेला वाटा तसेच राज्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची स्थापना करण्यामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा असलेला हातभार याबाबत ची माहिती मा. प्रतीक चन्नावार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी दिली.
तसेच कृषी विभागाने अधिकचे सतर्क राहून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा पुरवावी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व तालुक्यातील खते व बियाणे यांचा पुरवठा व सनियंत्रण करावे असे सूचना विशाल तांबे सभापती पंचायत समिती जुन्नर यांनी दिल्या. आपला देश शेतीप्रधान असून शेतकरी जगला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक व सामाजिक स्तर प्राप्त झाला पाहिजे व त्यासाठी कृषी विभागाने सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन प्रियांका शेळके यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी शेती करताना कशाप्रकारे शेती करावे , रासायनिक खतांची व्यवस्थापन ,सेंद्रिय खतांची व्यवस्थापन याबाबतचे मार्गदर्शन राहुल घाडगे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी केले. तसेच कृषी विभागाकडील विविध योजनांचा आढावा तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून विकास चव्हाण व नीलम बेल्हेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शेवटी अध्यक्षांच्या वतीने सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून सदरचा कार्यक्रम संपल्याचे बुधवंत यांनी जाहीर केले अशी माहिती आत्मा कृषि चे सूर्यकांत विरणक यांनी दिली.

