अवैधरित्या राहत असलेले तीन बांग्लादेशी नागरिक जेरबंद

1 min read

अहिल्यानगर दि.२७:- पोखर्डी (ता. अहिल्यानगर) परिसरात अवैधरित्या राहत असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांना एमआयडीसी पोलिसांनी काल (ता. २६) ताब्यात घेतले. भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीच्या आधारे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी पोखर्डी येथील एका खडीक्रशर जवळ तीन बांग्लादेशींना ताब्यात घेतले.जहांगीर अबुताहेर शेख (वय ३४, रा. चातपूर, राज्य चेटोग्राम, बांग्लादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (वय ४०, रा. खजीर खाली, बांग्लादेश) व मुश्रफ हबीब शेख (वय ४०, रा. चातपूर, राज्य चेटोग्राम, बांग्लादेश) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर बनावट कागदपत्रे मिळून आली आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!