शिवांजली विद्यार्थी वसतिगृहात गरीब मुलांना मोफत मिळवून दिला प्रवेश
पिंपळवंडी दि.२५ – चाळकवाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी शिवांजली विद्यार्थी वसतिगृहात जळगाव जिल्ह्यातील दुर्बल घटकातील,गरीब घराण्यातील मुलांचा मोफत प्रवेश जळगाव जिल्ह्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे सहकार्याध्यक्ष रमेश वाघ यांनी मिळवून दिला.
शिवांजली वसतिगृहाचे मुख्याध्यापक भानुदास चासकर यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक भानुदास चासकर,अण्णासाहेब घुले,महेश कुऱ्हाडे, संतोष चव्हाण, बाळासाहेब माकर, पारनेर तालुक्याचे,
जय मल्हार क्रांती संघटनेचे अन्याय अत्याचार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतर,आळे गावचे नवनिर्वाचित सरपंच मुकुंद भंडलकर,अभिजित मदने, जय मल्हार क्रांती संघटनेचे जुन्नर तालुका संपर्क प्रमुख संदीप शितोळे यादी मान्यवर उपस्थित होते.
