जामखेड येथील कला केंद्रावर छापा ; गुन्हा दाखल

1 min read

जामखेड दि.२०:- जामखेड तालुक्यातील कला केंद्रावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एका जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच रात्रीच्यावेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. या संशयित आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.गणेश प्रभाकर चव्हाण (वय.२९), स्वप्निल नामदेव थोरात (वय ४०), शुभम सुर्यभान चव्हाण (वय २४), देविदास रावसाहेब पवार (वय. ३५, चौघे रा. जामखेड), सत्यजित भागवत शेंडगे (वय २१), आदित्य रामप्रसाद गजमल (वय २३, दोघे रा.गेवराई, जि.बीड), असे संशयित रित्या फिरणाऱ्या आरोपींचे नावे आहेत. तसेच रात्री उशीरा पर्यंत कला केंद्र सुरू ठेवणाऱ्यावरही या पथकाने कारवाई केली असून याप्रकरणी विश्वास बाबूजी जाधव (वय ३४, रा. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!