आळे येथील रेडा समाधी मंदिर पालखीचे प्रस्थान

1 min read

आळेफाटा दि.२०: ‘ज्ञानोबा माउली तुकाराम,’ ‘पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला,’ ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात आळे (ता. जुन्नर) येथील संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्री क्षेत्र आळे ते पंढरपूर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याने गुरुवार दि.१९ रोजी प्रस्थान झाले.प्रस्थानाची महापूजा शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव, सुदाम महाराज बनकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे माजी सचिव अजित कुऱ्हाडे, जेजुरी येथील मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष तुषार सहाने, सरपंच मुकुंद भंडलकर यांच्या हस्ते करण्यात आले. रामदास महाराज सहाणे यांच्या कडे वीणा देऊन ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सुनील जाधव, कार्याध्यक्ष नागेश कुऱ्हाडे यांच्या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप पाडेकर, खजिनदार नीलेश पिंगळे, सचिव जीवन शिंदे, जिल्हा
परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे, पांडुरंग डावखर, अमोल भुजबळ, संदीप निमसे, संतोष कुऱ्हाडे, म्हतू सहाणे, संजय गाढवे, होनाजी गुंजाळ, गणेश शेळके, आनंद शिरतर, ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर, अरुण गुंजाळ, दिगंबर घोडेकर, गिरीश कोकणे आदी मान्यवर ग्रामस्थ, तसेच वारकरी उपस्थित होते. हा दिंडी सोहळा आळे, बेल्हा, पारगाव (मंगरूळ), हाजीटाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, काळेवाडी, भिगवत स्टेशन, पळसदेव, वनगळी, संस्थान रांझणी देवाची, टेंभुर्णी, करकंब या गावांमध्ये मुक्काम करत मंगळवारी (ता. ५ जुलै) पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!