जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ
1 min read
पुणे दि.१९:- जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ. आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट बसविता येणार, राज्य सरकारचा निर्णय झाला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट आवश्यक आहे.
यापूर्वीची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता ही शेवटची संधी असून, यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
