केदारनाथ यात्रेवर निघालेले हेलिकॉप्टर कोसळले,पर्यटकांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

1 min read

देहरादून दि.१५:- उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. केदारनाथ यात्रेवर निघालेल्या ५ भाविकांना घेऊन जाणारे आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाले.

हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात उंचावर झाला आहे, त्यामुळे बचाव पथकाला पोहोचण्यास उशीर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते.

उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन म्हणाले की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!