लकी नंबर ठरला माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची अंतिम प्रवासाची तारीख
1 min read
अहमदाबाद दि.१४:-गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी १२०६ या आकड्याला लकी नंबर मानत. मात्र, तो क्रमांक रूपाणी यांच्यासंदर्भात दुर्दैवी योगायोग घडवणारा ठरला. अहमदाबादमधील १२ जूनच्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांत त्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लकी नंबरच अंतिम प्रवासाची तारीख (१२/६) ठरला.रूपाणी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे नोंदणी क्रमांक १२०६ असे समान होते. त्यामुळे रूपाणी राहत असलेल्या राजकोटमध्ये तो क्रमांक फेमस झाला होता.
संबंधित क्रमांकाचे वाहन दिसल्यास ते रूपाणी यांचे असल्याचे संपूर्ण राजकोट ओळखायचा. साहजिकच, रूपाणी यांच्या लकी नंबरविषयीची माहिती असणारे सगळेच त्यांच्याबाबत घडलेल्या दुर्दैवी योगायोगाने हळहळले.