बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जाच्या व्याजदरात घट

पुणे, दि. १२ – देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रन १० जून २०२५ पासून गृह, कार, शिक्षण यासहरेपो दरांशी जोडलेल्या अन्य कर्ज योजनांच्या व्याजदरात ०.५०% घट केली आहे. व्याज दरातील घट या लाभामुळे आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचा दाखवून देत आहे. व्याजदराच्या सध्याच्या स्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बँक आपली रिटेल क्षेत्रातील कर्जे स्वस्त दराने देऊ करीत आहे.सद्य स्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र, ७. ३५% पासून गृह कर्ज व ७.७०% पासून कार कर्ज देऊ करत असून. बँकिंग उद्योगातील सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँकापैकी एक आहे.गृह कर्जाच्या सुधारित व्याजदरांसाठी तसेच बँक ऑफ महाराष्ट्र देऊ करीत असलेल्या अन्य सर्व वित्तीय सेवांच्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे