जुन्नरच्या पूर्व भागात ऊस लागवड सुरू
1 min read
बेल्हे दि.९:-आळेफाटा परीसरात ऊसाची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसुन येत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातुन पिंपळगाव जोगे धरणाचा कालवा गेल्यामुळे या कालव्याच्या जोरावर राजरी, वडगाव आनंद, आळे, बोरी, जाधववाडी, गुंजाळवाडी या गावांमधील शेतकरी ऊस,केळी, द्राक्षे ही बारमाही पिके घेऊ लागला आहे. यामध्ये विशेष करून ऊस हे पिक घेण्यास शेतक-यांणी प्राधान्य दिलेले असुन या हंगामातील लागवडी सुरवात झालेली दिसुन येत आहे.पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड होत असुन.
चालुवर्षी या परीसरातील शेतकरी हे साडेतीन फुट चार फुट सरी फुट अंतरावरील सरी तसेच आधुनिक पध्दतीने ऊसाची लागवडी करणा-यांवर भर देत आहे.सुरूचा ऊस व आडसाली अशी दोन टप्प्यांत लागवड केली जाते.
यामध्ये आडसाली ऊसाची लागवड ही जुन महीण्यात करावी लागते व सुरू ऊसाची लागवड नोव्हेंबर महिन्यात करावी लागते.परंतु जवळपास सर्वच शेतकरी हे आडसाली लागवड करणा-यावर भर देत आहे.