दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात स्वर्गीय मगन गाडगे यांची पुण्यतिथी साजरी

1 min read

निमगाव सावा दि.२९:- येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व स्वर्गीय मगन महादू गाडगे यांचे सातवे पुण्यस्मरण दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे साजरे करण्यात आले.स्वर्गीय मगन गाडगे हे श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने या संस्थेने वाटचाल करून पुढे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात करण्यात त्यांची मोलाची साथ होती. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेला सोपान गाडगे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. यावेळी निमगाव सावा व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. जि. प. पुणेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माजी सरपंच इब्राहिम शेख पटेल,आदर्श शिक्षक गणपत घोडे गुरुजी, निवृत्ती गाडगे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष गाडगे, आदर्श शिक्षक चंद्रकांत जावळे, रानमळाचे माजी सरपंच सुरेश तिकोणे, ह.भ.प. विजय महाराज खाडे, सोपान गेनभाऊ गाडगे, निमगाव सावाचे विद्यमान सरपंच किशोर घोडे, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे सचिव परेश घोडे, उपाध्यक्ष कृष्णा गाडगे, संचालक दत्तात्रय घोडे, सोपान गाडगे, श्रीहरी भालेराव, बाळासाहेब गाडगे, माजी सरपंच रोहिदास खाडे, उत्तम गाडगे, काशिनाथ गाडगे, माणिक पळसकर, नवनाथ गाडगे, रामदास गाडगे, महादू गाडगे, भालचंद्र उनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे