राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी:- खासदार निलेश लंके

1 min read

राहुरी दि.२५:- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते देवस्थान शनिशिंगणापूरला रेल्वे धावणार आहे. धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, निधीही मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली.हा मार्ग २१.८४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यासाठी ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूरला दिवसाला ३० हजार ते ४५ हजार भाविक ये-जा करतात. शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला आल्यानंतर भाविक हे शनिशिंगणापूरला जातात. शिर्डीपर्यंत रेल्वेची सुविधा आहे. मात्र, शनिशिंगणापूरला येण्यासाठी भाविकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. त्यामुळे या भागात रेल्वे सुरू करण्याची जुनी मागणी होती. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे