पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आज एकत्र; २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याचा उद्देश

नवी दिल्ली दि.२४: – नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आज (शनिवारी) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होईल. त्यामुळे मोदी आणि सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री एकत्र आलेले दिसतील. बैठकीत भारताला वर्ष २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याच्या उद्देशातून राज्यांवर फोकस असेल. विकसित भारतासाठी विकसित राज्य अशी बैठकीची संकल्पना आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या आराखड्यावर, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर बैठकीत चर्चा होईल. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दरवर्षी होते.
मागील वर्षीच्या बैठकीत १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले नव्हते. त्यामुळे यावेळच्या बैठकीत किती राज्ये, केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार, याविषयी उत्सुकता आहे.