वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा आणि दिराला अटक

1 min read

पुणे दि.२३:- पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दिर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास बावधन पोलिसांनी हगवणे पितापुत्राला अटक केली. पहाटेच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आज यश आले आहे. या दोन्ही आरोपींना या घटनेच्या ७ व्या दिवशी अटक करण्यात आली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आज अखेर या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल झालेले राजेंद्र आणि शशांक हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. हगवणे पिता-पुत्राला आम्ही सोडणार नाही, असा इशाराही अजितदादांनी दिला होता. दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काल कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. त्या वेळी अजित पवार यांनी फोनवरून वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे