जीएमआरटी ग्लोबल सायन्स एक्झिबिशन मध्ये समर्थ च्या विद्यार्थ्यांचे यश

1 min read

बेल्हे दि.२१:- नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएमआरटी वर्चुअल सायन्स डे २०२५ पारितोषिक वितरण सोहळा एन सी आर ए ऑडिटोरियम टी आय एफ आर पुणे विद्यापीठ कॅम्पस मध्ये नुकताच संपन्न झाला.हे प्रदर्शन जीएमआरटी मार्फत भरवण्यात येणारे मोठे ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन असून भारतातून सुमारे साडेचारशे हून अधिक शाळा व महाविद्यालयांतून १७७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.यामध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील मयूर देशमुख अक्षय कासार आणि अंकिता दिवेकर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ऑटो सर्व्हेअर अँड सिव्हि बोट या प्रकल्पाचा बीई,एम ई आणि एम एस्सी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.तसेच वैष्णवी म्हस्के,सानिका ढोबळे,निकिता काळे आणि श्रुती शिंदे यांनी तयार केलेल्या मल्टीफंक्शनल इको फ्रेंडली ऍग्रो मशीन या प्रकल्पास द्वितीय क्रमांक तर अथर्व पोखरकर,यश शिंदे,निकिता सरोदे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट मटेरियल ॲन्ड कंट्रोल एअर ॲन्ड वॉटर पॉल्युशन या प्रकल्पास उत्तेजनार्थ व सिद्धार्थ वाघ,दिनेश थोरात,अपूर्वा पोखरकर यांनी तयार केलेल्या आरएफआय डी बेस पोल्युशन कंट्रोल अल्गोरिदम फॉर इमिशन्स इन सिटीज युजिंग आयओटी या या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्याचप्रमाणे मोस्ट व्ह्यूड अँड रेटेड प्रोजेक्ट या कॅटेगिरी मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील पायल भगत व हरीश धशरवार यांनी तयार केलेल्या ड्रोन डिटेक्शन युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर यांनी दिली. एन सी आर ए, टी आय एफ आर सेंटर डायरेक्टर डॉ.यशवंत गुप्ता, आऊट्रीच कमिटी प्रमुख डॉ.दिव्या ओबेरॉय, जीएमआरटी सायन्स डे चे प्रमुख डॉ.ईश्वरचंद्र, जीएमआरटी सायन्स डे चे सहप्रमुख डॉ.जे के सोळंकी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजचे अध्यक्ष निलेश छाडावेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.हे प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजीनियरिंग विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके, प्रा.प्रियांका लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे