कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; ६ जणांचा मृत्यू; काहीजण जखमी; बचावकार्य सुरू
1 min read
ठाणे दि.२०:- कल्याण पूर्वमधील चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही घटना घडली.
या ठिकाणी महापालिकेचे बचावपथक पोहोचलं असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी सापडले आहे का याचा शोध सुरू आहे. कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर परिसरात ही घटना घडली आहे. या भागात असलेल्या सप्तशृंगी को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाची ४ मजली इमारत आहे.
या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुरस्तीचं काम सुरू होतं. पण दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळल्यानंतर थेट तळमजल्यापर्यंत येऊन धडकला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.
स्लॅब खाली अडकून सुरुवातील तीन महिलांचा मृत्यू झाला तर एका दीड वर्षांच्या मुलीचाही यात मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. नंतर ढिगाराखाली आणखी ३ जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
इतर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.