गांजा विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात

1 min read

अहिल्यानगर दि.२०:- भिंगार कँम्प पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना भिंगार कँम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संभाजी छगन गर्जे (वय ३१, रा. मेहेकरी, ता.जि. अहिल्यानगर), विजय अनिल साळवे वय ३८, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीनुसार बेल्हेश्वर चौकातील मोकळ्या जागेत गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९ .५० ग्रॅम गांजा ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार रवी टकले, दीपक शिंदे, बापूसाहेब म्हस्के, इसराईल पठाण, समीर शेख, प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!