१४ नंबर येथे अंगावर वीज पडून दोघे जखमी; एक गंभीर

1 min read

१४ नंबर दि.१९:- जुन्नर तालुक्यातील येथे सोमवार (दि.१९) रोजी दुपारी पुणे- नाशिक महामार्गावर वीज कोसळल्याने मध्य प्रदेश येथील सोनू कोल (वय 22), अमन राजमान कोल (वय 18, सध्या दोघेही राहणार 14 नंबर) हे दोन बांधकाम मजूर भाजल्याने जखमी झाले.

यापैकी सोनू कोल हा भाजल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज दुपारी 14 नंबर येथे घरी जात असताना विजेचा मोठा आवाज झाला. सोनू कोल याच्या गळ्यात धातूची चैन होती. यामुळे विजेचा प्रवाह उतरून गळ्याभोवती भाजल्याने सोनू हा गंभीर जखमी झाला त्या नंतर तो बेशुद्ध पडला.

त्याचा गळा, दोन्ही पाय व पोटाच्या भागावर भाजल्याच्या खुणा आहेत. अमन कोल किरकोळ जखमी झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे