हैदराबादमध्ये चारमीनारजवळील इमारतीला भीषण आग; १७ जणांचा होरपळून मृत्यू

1 min read

हैदराबाद दि.१८:- हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हाऊसच्या इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.आगीचं अधिकृत कारण कळू शकलेलं नाही.या इमारतीत चारहून जास्त कुटुंब राहत होती. याशिवाय 30 हून जास्त लोक राहत असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या इमारतीतून 14 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. यातील कित्येक जण गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनुसार या इमारतीतीत 30 हून अधिक लोक राहत होते. या दुर्घनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना प्रत्येक 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपये देण्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं.पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, ‘हैदराबादमधील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे खूप वेदना होत आहे. अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले की, ‘या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत आग कशामुळे लागली याचा अद्याप शोध लागलेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री खूप उष्णता होती आणि घरात बसवलेले सर्व एसी चालू होते. यामुळे घराचे वायरिंग गरम झाले असावे त्यामुळे वायरिंगला आग लागली आणि त्यातून निघालेल्या ठिणगीने काही वेळातच भयानक रूप धारण केले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आग इतक्या वेगाने पसरली की लोकांना बाहेर पळण्याची संधी देखील मिळाली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!