मोदीजी ने मेरा ‘सिंदूर’ मुझे लौटा दिया; बीएसएफ जवानाची पत्नी भावूक 

1 min read

नवीदिल्ली दि.१४:- एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे भारतीय सैन्य दलाच्य बीएएसएफ तुकडीतील जवाने सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला होता. गेल्या 22 दिवसांपासून पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने आज

भारताच्या स्वाधीन केल्यानंतर साहू यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत देशवासीयांचे आभार मानले. साहू यांच्या पत्नी रजनी यांनी माध्यमांशी बोलताना घटनाक्रम उगडला. तसेच, सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा आम्हाला सकाळी फोन आला, त्यांनीची ही गुडन्यूज दिल्याचे त्यांनी म्हटले.

या कठिण परिस्थिती सैन्यातील अधिकारी, सरकार आणि देशावासीय आमच्या पाठीशी उभे होते, त्या सर्वांचे मी आभार मानते. मोदीजीने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया, अशा शब्दात हात जोडून रजनी यांनी केद्र सरकारचे आभार मानले आहेत.

माझे पती पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या वृत्तपासून आम्ही काळजीत होतो. केंद्र सरकारपासून सगळ्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा राहिला, संपूर्ण देश आमच्यासोबत उभा होता. मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे. 22 एप्रिल रोजी आपल्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी हल्ला केला.

त्यानंतर, 15 ते 20 दिवसांत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या महिला भगिनींचं कुंकू पुसलं, त्याचा बदला आपण घेतला. मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव या मिशना दिलं होतं, आता माझं कुंकू मला परत मिळवून दिलंय. मोदीजीने मेरा सिंदूर मुझे लौटा दिया..

अशा शब्दात पाकिस्तानातून भारतात परतलेल्या बीएएसएफ जवानाच्या पत्नीने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, माझ्या पतीसोबत माझं व्हिडिओ कॉलवरुन संभाषण झालं, ते ठीक आहेत. 22 दिवस पाकिस्तानच्या तावडीत अडकल्याने काही प्रमाणात विकनेस आला असेल, पण त्यांची प्रकृती ठीक आहेत.

लवकरच ते घरी येतील, असा विश्वासही रजनी शॉ यांनी व्यक्त केला. भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती.

ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात आल्यानंतर पाक रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 22 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते. अखेर आज मायभूमीत त्यांचं आगमन झाल्याने देशवासीयांनी आनंद व्यक्त केला. तर, शॉ कुटुंबीयांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे