ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराने दिली सविस्तर माहिती

1 min read

नवी दिल्ली दि.१२:- जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूरट मोहिम राबवली आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान आज ऑपररेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यप्त जम्मू आणि काश्मीर येथील ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती डीजीएमओकडून देण्यात आली.ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देण्यासाठी आज(११ मे) रोजी तीन्ही सेना दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करणे हाच होता. या अंतर्गत ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते, भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून या ठिकाणे निवडण्यात आली होती. ज्यापैकी काही पीओके मध्ये तर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती. लष्करच्या मुरीदके येथील तळाला देखील यामध्ये लक्ष्य करण्यात आले.नवी दिल्ली : यावेळी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, या ९ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यामध्ये १००हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यामध्ये यूसुफ अजहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद अशा दहशतवाद्यांचा देखील समावेश होता, जे आयसी८१४ चे अपहरण आणि पुलवामा स्फोटात सहभागी होते. यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उलंघन करण्यात आले आणि शत्रूची प्रतिक्रिया अनिश्तित आणि घाबरलेले होती, ज्यामध्ये दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात नागरिक, गावे आणि गुरुद्वारा अशा धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्युमुखी पडले. भारतीय वायु दलाने या हल्लात महत्त्वाची भूमिका बजावली आणि यापैकी काही तळांवर हल्ला केला तसेच भारतीय नौदलाने देखील मदत केली.एअर मार्शल ए.के. भारती यांनी देखील यावेळी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ८ आणि ९ मेच्या रात्री २०.३० वाजेपासून आपल्या शहरांवर ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांनी मोठा हल्ला करण्यात आला, हा हल्ला श्रीनगरपासून सुरू होऊन नलियापर्यंत होता… आम्ही तयार होतो आणि आपली हवाई सुरक्षा तयारीने जमिनीवर किंवा शत्रूने लक्ष्य केलेल्या ठिकाणांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली… एका संतुलित प्रतिक्रियेअंतर्गत आम्ही पुन्हा एकदा गुजरांवाला येथे सैन्य तळांवर, देखरेख रडारांना लक्ष्य केले… ड्रोन हल्ले सकाळपर्यंत सुरू होते, ज्यांना आम्ही प्रत्युत्तर दिले. हे ड्रोन हल्ले लाहोरच्या जवळून केले जात होते, शत्रूने त्यांच्या नागरी विमानांना देखील लाहोरहून उड्डाण करण्याची परवानगी दिली होती, फक्त त्यांचे विमानच नाहीत. तर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांना देखील अशी परवानगी देण्यात आली होती, जे खूपच असंवेदनशील होते आणि आम्हाला अधिक काळजी घ्यावी लागली. ऑपरेशन सिंदूर काय आहे? पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर नावाने मोहिम राबवली होती. या मोहिमेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले एअर स्ट्राइक करण्यात आल्या. या हल्ल्यात किमान १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली होती. यापूर्वी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लक्ष्य करत हे ऑपरेशन चालवण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे