विद्यानिकेतन च्या १०० टक्के निकालाची १२ वर्ष परंपरा कायम
1 min read
साकोरी दि.१३:- विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल चा निकाल १०० लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली. विद्यानिकेतन पी. एम हायस्कूल या शाळेची स्थापना होऊन १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत.
या बारा वर्षाच्या कालावधीत विद्यानिकेतन मध्ये, १२ वी सायन्स १२ वी कॉमर्स आणि इयत्ता १० वी मध्ये एकही विद्यार्थी अद्याप नापास झालेला नाही आज
घोषित झालेल्या दहावीच्या निकालामध्ये मुलींने विशेष बाजी मारली आहे. पहिल्या पाच मध्ये खालील प्रमाणे विद्यार्थी आहेत 1) वाजे पूर्वा सचिन 90%, 2) भोर ज्ञानेश्वरी संतोष 88.40%, 3) कापसे धनश्री संदीप 87%, 3) कांबळे गौरी रामचंद्र 87%, 4) पानसरे श्रद्धा योगेश 84%, 5) भोर वेदांत शांताराम 81.40%
या प्रमाणे गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थापक पी.एम साळवे तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्य रूपाली भालेराव यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल साकोरीचे प्राचार्य रमेश शेवाळे यांनी केले.