तारकेश्वर गडाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली ठाम साथ:- उपमुख्यमंत्री शिंदे
1 min read
आष्टी दि.१२:- तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे “मूर्ती लहान पण कीर्ती महान” या उक्तीप्रमाणे गडाचे चोख व्यवस्थापन करत असून, त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. समाजप्रबोधनकार वाचासिद्धी नारायणबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शुक्रवारी तारकेश्वर गडावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गडाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली ठाम साथ राहील, अशी ग्वाही दिली.यावेळी व्यासपीठावर तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, पद्मश्री पोपट पवार,
व्याख्याते गणेश शिंदे, अक्षय भोसले, शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे उपस्थित होते. यावेळी गडावर नारायण बाबांच्या समाधी दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. प्रास्ताविक अक्षय भोसले तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.