विद्या निकेतन ज्युनियर काॅलेजचा शुभम मोरे घारगाव केंद्रात प्रथम

1 min read

बोटा दि.६:- विद्या निकेतन ग्लोबल इंस्टिट्यूट बोटा संचलित,विद्या निकेतन ज्युनियर काॅलेज चा निकाल 98.46% लागला असल्याची माहिती प्राचार्या सुनिता कडपा यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन विज्ञान शाखेतील मोरे शुभम संपत हा 80.17% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्न झाला आहे,

तसेच घारगाव केंद्रातही प्रथम आला आहे.द्वितिय क्रमांक शेळके यश बाळू (79.83%) व गुप्ता नकुल चंचल (79.67%) या दोघांनी घारगाव केंद्रात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे, तृतिय क्रमांक गाडेकर धनश्री राजेंद्र (76.50%), चतुर्थ क्रमांक शिरोळे उत्कर्षा दशरथ (73.33%) तसेच कंदला राघवा रवी याने (71.33) मार्क मिळवून पंचम क्रमांक मिळवला आहे.

या विद्यार्थ्यांना प्राचार्या सुनिता कडपा, कॅम्पस डायरेक्टर राहाने दिपक, गोडसे रविंद्र, प्रा.पारळकर अमोल, पल्लवी वाकचौरे, प्रा.पटेल जहिद, विजया जाधव व कोल्हे शितल या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन रामदास पोखरकर व

सी.ई.ओ.डॉ. पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षक पालकांचे आभार मानले. “या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ आहे” असे त्या म्हणाल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे