महेंद्र बोऱ्हाडे सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक:- सुरेश सातपुते उपसरपंच

1 min read

शिरोली दि.८:- ही शाळा माझी आहे. ही भावना ज्या शिक्षकांच्या अंतकरणात सदैव असते, तोच शिक्षक विद्यालयासाठी घरच्यासारखे काम करतो. महेंद्र बोऱ्हाडे यांनी गेल्या 30 वर्षातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पुढे जाऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला व फक्त आठ महिन्यातच शाळेचा चेहरा मोहराच बदलून टाकला.

मुख्याध्यापक बोऱ्हाडे यांचे कर्तुत्व आम्हा सर्व गावकऱ्यांच्या व पंचक्रोशीतील जनतेच्या सदैव स्मरणात राहील असे गौरवोउद्गार नवनिर्वाचीत उपसरपंच सुरेश सातपुते यांनी काढले. यावेळी १४ बॅचचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे सुलतानपूर येथे संस्थेने बांधून दिलेल्या शाळेच्या संरक्षण भिंतीचे तसेच दोन स्वच्छतागृहांचे व दोन वर्ग खोल्यांचे माजी विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे, विकास गुंजाळ, शरद मुळे, डॉ. किशोर मुळे,नितीन आतकरी, राकेश खिलारी, नितीन खिलारी, बाळासाहेब डावखर, प्रसाद खिलारी, रखमा खिलारी, अविनाश खिलारी, उमेश खिलारी, नवनिर्वाचित उपसरपंच सुरेश सातपुते,

व्यवस्थापन कमिटीचे सदस्य ह.भ.प.तुकाराम डावखर, माया सोनवणे व रामभाऊ सातपुते या सर्वांच्या शुभहस्ते विविध उद्घाटने केली गेली. असंख्य पालक व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अजित खिलारी, भानुदास खिलारी, संतोष खिलारी भरत खिलारी, हेमचंद्र डावखर, निलेश मुळे, सुरेंद्र खिलारी, गणेश शिंदे, अर्चना शिंगोटे, जयश्री जगदाळे, शुभदा खिलारी, स्वाती पोळ, मंगल डेरे,ज्योती शेटे,विद्या खिलारी, नीता तांबे व अमन मणियार उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, उपसचिव एल एम पवार, सहाय्यक सचिव ए एम जाधव, खजिनदार मोहनराव देशमुख, बांधकाम पर्यवेक्षक सय्यद मुलानी, संस्था रजिस्ट्रार- सिताराम अभंग, परीक्षा मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे,

किरण आहेर या सर्व संस्थेतील व सर्व विभागातील सर्व तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळत असते. शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, पुणे मुंबई मधील उद्योजक व संस्थेच्या माध्यमातून ह्या शाखेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.

मग कधी देणगींच्या माध्यमातून तर कधी भेट- वस्तूंच्या माध्यमातून कायापालट होत आहे. विद्यालयाचा परिपूर्ण स्टाफ, अत्याधुनिक स्वरूपातील सर्व उपक्रमांसाठी सज्ज असलेलं विद्यालय म्हणून आपल्या शाखेची ओळख निश्चितच होत आहे. ही विद्यालयासाठी गावासाठी व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आहे.

असा आत्मविश्वास मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या समवेत संवाद साधताना व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे