समर्थ जुनिअर कॉलेज चा निकाल १०० टक्के

1 min read

बेल्हे दि.६:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बांगरवाडी (बेल्हे) या विद्यालयाचा एच.एस.सी बोर्ड परीक्षा २०२५ चा विज्ञान व वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.अशी माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.विज्ञान शाखेतील भावना गुंजाळ ही ८७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर तिचीच जुळी असलेली बहिण भक्ती गुंजाळ हिने ८४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.शुभम गुंड ८१.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.अस्मिता सागर हिने ८८.६७ टक्के गुण मिळवून वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेत प्रथम क्रमांक,अमृता मुरादे ८४.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ओम गोरडे ८०.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.समर्थ ज्युनिअर कॉलेज मध्ये फेब्रुवारी-मार्च प्रमाणपत्र परीक्षा २०२४-२५ साठी २५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन करणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे:- कृतिका आतकरी-८०.६७ %, अकिब मोमीन-७६.३३%, वैष्णवी गाडगे-७५.००%रितिका जाधव-७९.३३%, सिद्धी कसाळ-७६.६७%, दिक्षा भोसले-७६.५०%, प्रिया गायकवाड-७६.००%, राधिका लंके-७५.५०%, चंदना डुकरे-७५.००%त्याचप्रमाणे प्रथम श्रेणी मध्ये ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा.संतोष पोटे यांनी दिली. भावना आणि भक्ती गुंजाळ या दोन जुळ्या बहिणी बद्दल बोलताना प्राचार्या वैशालीताई आहेर म्हणाल्या की दहावीला देखील या जुळ्या बहिणींनी ९१.४०% गुण मिळविले होते.बारावीला देखील हीच परंपरा पुढे कायम ठेवत या जुळ्या बहिणींनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे. या मुली सर्वसामान्य कुटुंबातील असून वडील पुंडलिक अनंता गुंजाळ हे गुळंचवाडी या गावातील शेतकरी आहेत. आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन ए आय इंजिनीयरिंग या क्षेत्रामध्ये उच्च पदावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याचे पुंडलिक गुंजाळ यांनी सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले. या विद्यार्थ्यांना प्रा.संतोष पोटे, प्रा.राजेंद्र नवले, प्रा.विनोद चौधरी, प्रा.अमोल खामकर, प्रा.संगीता रिठे, प्रा.रोहिणी औटी, प्रा.नूतन पोखरकर, प्रा.ऋतुजा थोरात, प्रा.श्वेता जाधव, प्रा.वैशाली ढाकोळ, प्रा.सोनल कोरडे, प्रा.सुरेखा पटाडे, प्रा.राहुल वाळुंज, प्रा.प्रतिमा आवटे, प्रा.नेहा बुगदे, प्रा.दिपाली भोर, प्रा.वंदना गोरडे, प्रा.सायली भोर, प्रा.सायली नवले, प्रा.अक्षता मोरडे, प्रा.स्वप्नील दाते, प्रा.संपत जाधव, प्रा.स्वाती खोडदे, प्रा.मुराद शेख यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे