हॉटेलमध्ये गुटखा विक्री, मालकावर गुन्हा

1 min read

जुन्नर दि.६- जुन्नर येथील गणेशखिंड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पान मसाला मोठ्या प्रमाणात जवळ बाळगून तो ग्राहकांना विक्री करीत असताना पोलिसांना मिळून आला.

याप्रकरणी हॉटेलचालक मच्छिंद्र गेनभाऊ आहेर (रा. भुंडेवाडी, जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार समाधान ताडगे यांनी फिर्याद नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, अंमलदार गणेश शिंदे करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे