आळ्यात महिलेला मारहाण; चाकूचा धाक दाखवून चोरी; १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लुटला
1 min read
आळेफाटा दि.५:- आळे (ता. जुन्नर) येथे चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करत ७२ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करत १ लाख ५ हजार रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना सोमवार (दि.५) रोजी पहाटे घडली.
शुभदा दिलीप धोंगडे असे जखमी वृद्ध महिलेचे नाव असून याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
आळे गावठाणात दुकानात राहणाऱ्या शुभदा दिलीप धोंगडे यांचे दुकानाचे शटर्स अज्ञात चोरट्याने वर करून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर हातातील चाकूने धाक दाखवत अंगावरील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, २५ हजार रुपयांचे मंचली हार व एक ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल
असा एकूण १ लाख ५ हजार रूपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. यावेळेस शुभदा धोंगडे यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. या घटनेत त्यांचे डोळ्यास व उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली. अशा अवस्थेत त्यांनी आरडाओरड केली. आरडाओरड केल्याने चोरट्याने पळ काढला.
आजूबाजूचे उठल्यानंतर त्यांना आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळतात आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद दुर्वे करत आहेत.