मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये बारावीचा निकाल ९८ टक्के
1 min read
कर्जुले हर्या दि.५:- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुल संचलित मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये बारावी मधील विज्ञान शाखेचा निकाल ९८.००% लागला. फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षेकरिता १०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
सदर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक तन्मय दत्ता ढोले (७५.००%), द्वितीय क्रमांक पियुष रघुनाथ झावरे (७०.००%), तृतीय क्रमांक नकुल संजय आहेर (६९.५०%), चतुर्थ क्रमांक प्रतिक्षा सुभाष भाईक (६८.८३%),पाचवा क्रमांक स्वरा प्रविण निघुट (६८.६७%) यांनी क्रमांक पटकावले.
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक वातावरणा बरोबरच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा वर्षभरामध्ये सातत्याने आयोजन केले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य राहुल सासवडे, गणेश हांडे, राजेंद्र साठे, हेमंत शिंदे,अजिंक्य बिडकर,कविता भालेराव, सुवर्णा उंडे, गिरिजा माळुंजकर यांचे मोलाचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सायन्स कॉलेजच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा मिरा आहेर, सचिव किरण आहेर,
कार्याध्यक्ष डॉ.दिपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, संचालिका डॉ.श्वेतांबरी आहेर, ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका शितल आहेर, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांनी या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.