बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 91.88 टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल
1 min read
पुणे दि.५:- बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 96.74 टक्के, पुणे : 91.32 टक्के, कोल्हापूर : 93.64 टक्के, अमरावती : 91.43 टक्के, छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के, नाशिक : 91.31 टक्के, लातूर : 89.46 टक्के, नागपूर : 90.52 टक्के,
मुंबई : 92.93 टक्के